पंढरपूर आषाढीवारी सेवा २०२२
तब्बल दोन वर्षानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारी होणार असल्याने या वर्षी येथे खूप मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. “आषाढी एकादशी” निमित्त, पोलिसांच्या विनंतीनुसार ‘अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ च्या (AADM) सदस्यांनी पोलीस उप-अधिक्षक श्री. विक्रम कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांची पंढरपूर पोलीस स्टेशन येथे जाऊन भेट घेतली व त्यांना AADMच्या गर्दी व्यवस्थापन सेवेची माहिती दिली. या बैठकीदरम्यान, श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे 9 आणि 10 जुलै 2022 रोजी होणार्या “पंढरपूर आषाढी वारी” सेवेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे १२०० डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटीयर्स ची (DMV) व्यवस्था करण्याची विनंती AADM कडे केली.
गेले दोन वर्ष वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले होते, व ह्या वर्षी वारकऱ्यांची त्यांच्या माऊलीला भेटायची ओढदेखील पूर्ण झाली. त्यांची भक्ती अनुभवून व त्यांची आर्तता बघून आपले ए ए डी एम चे डीएमव्हीज् देखील सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीत व ए ए डी एम च्या सेवेत पूर्णपणे रममाण झाले.